Jaywant kulkarni biography
जयवंत कुलकर्णी
जयवंत कुलकर्णीं (ऑगस्ट ३१, १९३१ - जुलै १०, २००५ :मुंबई, महाराष्ट्र, भारत) हे एक मराठी संगीतकार व गायक होते.[१]
जीवन
[संपादन]जयवंत कुलकर्णी यांना गायनाचे धडे तत्कालीन प्रसिद्ध शास्त्रीय गायक लक्ष्मणराव देवासकर यांच्याकडून मिळले. लक्ष्मणरावांनी त्यांना हार्मोनियम वाजवायलाही शिकवले.
जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील गाण्यांवर सत्तरच्या दशकातील तरुणाई इतकी फिदा होती की, त्यांनी मंचावर उभे राहून गायलेल्या “हिल पोरी हिला” किंवा “ही चाल तुरू तुरू” या दोन गाण्यांना हमखास “वन्स मोअर” मिळत असे. “सावध हरिणी सावध” हे त्यांचे आणखी एक प्रसिद्ध गाणे.
Nicanor abelardo biography and compositions furnitureउडत्या चालीच्या संगीतासोबतच जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील जोरकसपणा ही त्यांच्या काळची खासियत होती. मराठी चित्रपटगीतांसाठी व भावगीतांसाठी हा प्रयोग त्याकाळी नवीनच होता. जयवंत कुलकर्णी यांनी जी चित्रपट गीते गायली त्यांतल्या बऱ्याच गाण्यांमध्ये “गावरान बाज” ठासून भरलेला असे.
गायक
[संपादन]एक गायक म्हणून जयवंत कुलकर्णी यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले.
Henryk lobaczewski biography of abrahamत्यापैकी काही अतिशय गाजलेली मराठी गीते पुढे दिली आहेत. यांतील चित्रपटांत नसलेली भावगीतेही आहेत :
- अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वरबासरी, नाम त्याचे श्रीहरि नाम त्याचे श्रीहरि”
- अष्टविनायका तुझा महिमा कसा (चित्रपट- अष्टविनायक)
- आई तुझं लेकरु येडं ग कोकरु (चित्रपट- नवरा माझा ब्रम्हचारी)
- चांदणं टिपूर हलतो वारा (चित्रपट- गारंबीचा बापू)
- जीवन गगन मी पाखरू (चित्रपट- अनोळखी)
- देवकीचा तान्हा यशोदेचा कान्हा माया ममतेचा धागा जोडतो (चित्रपट- देवघर)
- माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी (चित्रपट- सोंगाड्या)
- “विठुमाउली तू माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठठ्लाची ”
- “सावध हरिणी सावध”
- हिल पोरी हिला”
- “ही चाल तुरू तुरू
पुरस्कार
[संपादन]ज्योतिबाचा नवस आणि एकटा जीव सदाशिव या चित्रपटातील गाण्यासाठी जयवंत कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले.
बाह्य दुवे
[संपादन]संदर्भ
[संपादन]जयवंत कुलकर्णी यांचे निधन[permanent dead link]
- ^"मराठी चित्रपटातील पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांच्यावरील लेख". लोकमत . 24 July 2017 रोजी पाहिले.